मुलाखतीला जात आहात तर मग हे वाचा….

जेव्हा तुम्ही मुलाखातीसाठी जाता तेव्हा तुमचे केवळ ज्ञानच नाही तर तुमचा लुक, पर्सनॅलिटी आणि ड्रेसिंग स्टाईल यादेखील गोष्टी पाहिल्या जातात. अनेकदा चुकीच्या ड्रेसिंगमुळे सिलेक्‍शन बोर्ड तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकते. केवळ ड्रेसिंग स्टाईलमुळे आपल्याला एखाद्या कंपनीने नाकारू नये, असे वाटत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. मुलाखतीला जाण्यापूर्वी आपण अनेकदा घाबरलेले असतो किंवा गोंधळाचा नादात आपण असे काहीतरी कपडे घालतो की जे आपल्याला शोभूनही दिसत नाही.

* मुलाखातीसाठी तयार होत असताना तुम्ही कोणत्या कंपनीसाठी आणि प्रोफाइलसाठी मुलाखात देत आहात हे सर्वप्रथम लक्षात घ्या. कॉर्पोरेट सेक्‍टरमध्ये जॉबच्या मुलाखातीसाठी जाताना शक्‍यतो निळा, ग्रे किंवा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करा. तसेच फॉर्मल ड्रेसमुळे तुमची समोरच्यावर चांगली छाप पडते.

* मुलाखातीसाठी जाताना हेअर स्टाइलवर लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. तुमचे केस तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. मुलींनी शक्‍यतो केस मोकळे सोडावेत किंवा सिंपल पोनी टेल बांधावा. मुलांनी मुलाखातीसाठी जाताना क्‍लिन शेव्ह आणि हेअर स्टाइल सिंपल ठेवावी.

* मुलाखातीसाठी जाताना विशेषतः मुलींनी जास्त गडद मेकअप करू नये. यामुळे तुमचे इंप्रेशन खराब होते. त्यामुळे अत्यंत सिंपल आणि लाइट मेकअप करावा, तसेच हातात साधंसं घड्याळ घालावं. मुलाखातीसाठी जाताना बॅग जास्त मोठी तसंच फॅन्सी नसावी.

Leave A Reply

Your email address will not be published.