नेपाळमध्ये 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

काठमांडू – नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शुक्रवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहे. भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी रिश्‍टर स्केलवर नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा राजधानी काठमांडूपासून पश्चिमेकडे 66 किमी अंतरावर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भूकंपाचा धक्का जाणवण्यास सुरू झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले. भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, मागील काही दिवसापासून नेपाळमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील एका महिन्यापासून नेपाळमध्ये छोटे-मोठे असे एकूण 8 भूंकपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)