काठमांडू – नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शुक्रवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहे. भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी रिश्टर स्केलवर नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा राजधानी काठमांडूपासून पश्चिमेकडे 66 किमी अंतरावर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Nepal: An earthquake of magnitude 4.7 on the Richter scale strikes 66km west of Kathmandu
— ANI (@ANI) May 17, 2019
भूकंपाचा धक्का जाणवण्यास सुरू झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले. भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, मागील काही दिवसापासून नेपाळमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील एका महिन्यापासून नेपाळमध्ये छोटे-मोठे असे एकूण 8 भूंकपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे.