पुणे – अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने कौतुक केले असुन हार्दिक पांड्याच्या तोडीचा एकही प्रतिभावान खेळाडू सध्या भारतीय संघात नसल्याचे मत सेहवागने मांडले आहे.
आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यात हार्दिक पांड्याने महत्वाची भूमिका बजावली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीचा विचार केला, तर हार्दिक पांड्यासारखा प्रतिभावान खेळाडू भारतीय संघात नाहीये. जर त्याच्या जवळ जाणारा एकही खेळाडू असता तर हार्दिकची विश्वचषक संघात निवड झाली नसती. सेहवागने हार्दिकची स्तुती करताना विजय शंकरच्या निवडीवरुन निवड समितीला टोला देखील लगावला आहे.