#IPL2019 : आयपीएल मुळे भारतीय संघाला ताकद मिळाली

धवन, पांड्या आणि राहुलला फॉर्म गवसला

पुणे – आयपीएलचे बारावे मोसम भारतीय संघाच्या विश्‍वचषकाच्या तयारी करिता उपयुक्त ठरला असुन यंदाच्या आयपीएलमधुन भारतीय संघतील “आऊट ऑफ फॉर्म’ खेळाडू फॉर्ममध्ये आल्याने भारतीय संघ व्यवस्थपनाने सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

विश्‍वचषकापुर्वी आयपीएलस्पर्धा भरविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर आजी-माजी क्रीडापटूंसह अनेक चाहत्यांनी टिका केली होती. आयपीएल दरम्यान भारतीय संघातील महत्वाचे खेळाडू जायबंदी होण्याचा धोका असल्या पासुन त्यांची शैली संघातुन खेळनाऱ्या परदेशी खेळाडूंना लक्षात आली तर त्याचा धोका भारतीय संघाला आगामी विश्‍वचषक स्पर्धेत होईल इथपर्यंत टीका बीसीसीआयवर करण्यात आली होती.

मात्र, यंदाचा आयपीएलचा मोसम संपला आणि बीसीसीआयवर टिका करणारेच आता बीसीसीआयच्या निर्णयाची स्तुती करताना दिसून येत आहेत. कारण यंदाच्या मोसमात भारतीय संघातील महत्वाचे खेळाडू पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आले असुन त्याचा फायदा निश्‍चीतच भारतीय संघाला आगामी विश्‍वचषक स्पर्धेत होईल.

यातील मुख्य खेळाडू म्हणजे सलामीवीर शिखर धवन, मधल्या फळीत खेळणार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, सलामीवीर लोकेश राहुल आणि सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी या सर्व खेळाडूंनी आपापल्या संघांकडून उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तर, गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्‍वर कुमार यांनी देखील आपली चमक दाखवत विश्‍वचषकासाठी संपुर्णपणे तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

यावेळी आयपील्ल स्पर्धा आणि त्यानंतर येणारी विश्‍वचषक स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये कमी अंतर असल्याने भारतीय संघातील मुख्य खेळाडूंना आराम मिळणार नाही असे म्हणत अनेक खेळाडूंनी विरोध केला होता. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंची रोटेशन पद्‌धत वापरत आयपीएल पुर्वीच खेळाडूंना आराम मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार तीन ते चार मालिकांमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देत त्यांच्या ऐवजी इतर खेळाडूंना पर्याय म्हणुन खेळवले होते.

तीच पॉलिसी बीसीसीआय आयपीएल दरम्यान वापरेल असे वाटत होते. मात्र बीसीसीआयने आयपीएल दरम्यान विश्रांती घ्यायची की नाही हे त्या त्या खेळाडूंवर सोपवले होते. त्यानुसार संघ मालकांनीही खेळाडूंना त्यांचे निर्णय घेण्याचा आधिकार दिला होता. मात्र, अनेक खेळाडूंनी विश्‍वचषकापुर्वी आपल्यातील क्षमता तपासुन पाहाण्यासाठी संपुर्ण स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहभागी खेळाडूंना त्याचा फायदा तर झालाच मात्र काही महत्वाच्या खेळाडूंना या स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आलीनाही. ज्यात भारताचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव असेल किंवा कोहलीचा गोल्डन हॅंड म्हणुन ओळखला जाणार केदार जाधव आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांना एकाही सामन्यात चमक दाखवता आली नाही त्यामुळे त्यांच्या कामगिरीची चिंता देखील संघ व्यवस्थापनाला असणार आहे.

यावेळी अनपेक्षितपणे संघात दाखल झालेल्या दिनेश कार्तिक आणि विजय शंकरयांची कामगिरी देखील यंदा संमिश्र झालेली असुन विश्‍वचषकापुर्वी त्यांच्या कामगिरीत सुधारणा होणे गरजेचे असल्याने विश्‍वचषकावेळी होणाऱ्या सराव सामन्यांमध्ये त्यांना आपल्यातील क्षमता सिद्ध करण्याची अंतिम संधी असणार आहे.

भारतीय खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी 

फलंदाज :

शिखर धवन – सामने – 16, धावा – 521, ऍव्हरेज- 34.73, सर्वाधिक – नाबाद 97.
लोकेश राहुल – सामने – 14, धावा – 593, ऍव्हरेज- 53.90, सर्वाधिक – नाबाद 100.
हार्दिक पांड्या – सामने – 16, धावा – 402, बळी – 14, ऍव्हरेज- 44.66, सर्वाधिक – 91.
महेंद्रसिंग धोनी- सामने – 15, धावा -416 , ऍव्हरेज- 83.20, सर्वाधिक – 84.
रोहित शर्मा – सामने 15, धावा 405, ऍव्हरेज – 28.92, सर्वाधिक – 67.

गोलंदाज :

जसप्रीत बुमराह – सामने – 16, बळी – 19, इकॉनॉमी – 6.63.
मोहम्मद शमी – सामने – 14, बळी – 19, इकॉनॉमी – 8.68.
युझवेंद्र चहाल – सामने – 14, बळी – 18, इकॉनॉमी – 7.82.
भुवनेश्‍वर कुमार – सामने – 15, बळी – 13, इकॉनॉमी – 7.81.

Leave A Reply

Your email address will not be published.