पुणे – साहिल गनगोटे, शाश्वत भोमे, साध्वी धुरी, सिया शेट्टी यांनी पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै. रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत आपला सुवर्ण धडाका कायम राखला.
टिळक जलतरण तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साहिल गनगोटेने तिस-या दिवसअखेर पाच सुवर्णपदके मिळवली. साध्वी धुरी, सिया शेट्टी यांनीही दोन सुवर्णपदकांची कमाई केली. शाश्वत भोमेही वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक मिळवले. शाश्वतने शनिवारी 11 वर्षांखालील मुलांच्या फ्रीस्टाइलमध्ये 1 मिनिट 09.32 से. वेळ नोंदवून सुवर्णयश मिळवले. शाश्वतने पहिल्या दिवशी 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.