हॉलिवूड सिनेमामध्ये काम करणार डिंपल कपाडिया

हॉलिवूडमधील “डनकर्क’, “इंडर्सटेलर’ आणि “द डार्क नाईट’ सारख्या सिनेमांचे डायरेक्‍शन केलेल्या ख्रिस्तोफर नोलानने डिंपल कपाडियाला एका हॉलिवूडपटाची ऑफर आली आहे. ख्रिस्तोफर नोलानने अलिकडचे या सिनेमाची घोषणा केली. प्रॉडक्‍शन हाऊस वॉर्नर ब्रदर्सनी या नवीन सिनेमाची स्टारकास्टही जाहीर केली आहे. या सिनेमाचे नाव “टेनेट’ असे असणार आहे. तर मायकेल कॅन, एरॉन टेलर, क्रेनेथ ब्रानेज आणि डिंपल कपाडिया हे त्यातील मुख्य कलाकार असणार आहेत.

आतापर्यंत या “टेनेट’चे शुटिंग सुरू देखील झाले आहे. हा एक ऍक्‍शन मुव्ही आहे. त्याला हेरगिरीची पार्श्‍वभुमीदेखील असणार आहे. याच्या पटकथेचे काम देखील स्वतः ख्रिस्तोफर नोलानने हाताळले आहे. या सिनेमाचे शुटिंग 7 वेगवेगळ्या देशांमध्ये केले जाणार आहे.

पुढच्या वर्षी 17 जुलैला हा “टेनेट’ रिलीज केला जाणार आहे. डिंपल प्रथमच हॉलिवूडपटामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. तिने काही इंग्रजी सिनेमांमध्ये काम केले आहे. पण हॉलिवूडच्या बॅनरखाली काम केलेले नाही. इतकी वर्षे सिल्व्हर स्क्रीनपासून दूर राहिलेल्या डिंपलसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)