सोने आणि चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली: चीन व अमेरिकेदरम्यानच्या वाढत चाललेल्या व्यापारयुद्धामुळे चलनबाजार, शेअरबाजार आणि धातूबाजारावरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे विविध बाजारांतील वातावरण नकारात्मक आहे. या परिस्थितीत जागतिक बाजारात बुधवारी सोन्याचे दर कमी झाले. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला. त्यामुळे बुधवारी भारतात सोन्याचे दर 135 रुपयांनी तर चांदीचे दर शंभर रुपयांनी कमी झाले.

अखिल भारतीय सराफा संघटनेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिल्ली सर्वात शुद्ध सोन्याचे दर 135 रुपयांनी कमी होऊन ते 33,260 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 135 रुपयांनी कमी होऊन ते 33,090 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दरम्यान तयार चांदीचे दर बुधवारी शंभर रुपयांनी कमी होऊन 38,200 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जोपर्यंत जागतिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत शेअर आणि चलन बाजाराबरोबरच सोने आणि चांदीच्या बाजारात अस्थिरता रेंगाळण्याची शक्‍यता असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)