हरियाणा – हरियाणातील गुरुग्राम येथील टोलनाक्यावर काल रात्री एका चारचाकी वाहनात दाखल झालेल्या दोन तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवून टोलचुकवेगिरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की हरियाणातील गुरुग्राम येथील टोलनाक्यावर काल रात्री एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये दोन तरुण दाखल झाले. पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुण वाहन चालवत होता तर काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुण बाजूला बसलेला होता. टोलनाक्यावर येताच हे दोन्ही तरुण गाडीतून उतरले आणि ‘टोल’ गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खिडकीकडे गेले. काही वेळातच यातील पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुण हातात बंदूक घेऊन टोलनाक्याच्या गेट जवळ आला व त्याने आपल्या साथीदारास गाडी पुढे घेण्यास सांगितले. यानंतर हे दोघेही तरुण तेथून पसार झाले.
या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी कारवाई करत संबंधित तरुणांना जेरबंद केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस चौकशीमध्ये तरुणांद्वारे टोल कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आलेली बंदूक बनावट असल्याचे आढळून आले आहे.
#WATCH Haryana: A man brandished a pistol at a toll plaza in Gurugram and fled without paying toll tax. Police have registered a case (15.5.19) pic.twitter.com/mhcsdxXmCu
— ANI (@ANI) May 16, 2019