दाभोलकर प्रकरण : ऍड. संजीव पुनाळेकर यांना जामीन

पुणे – अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशियित आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले बचाव पक्षाचे वकील संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजुर झाला आहे.

पहिले तीन महिने दर सोमवार आणि गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत मुंबई येथील सीबीआय कार्यालयात हजेरी लावणे, न्यायालय आणि सीबीआयच्या परवानगी शिवाय भारत सोडून न जाणे, पुराव्यांमध्ये ढवळाढवळ करायची नाही, साक्षीदारांवर दबाव टाकायचा नाही, तपास कामाकरीता सीबीआयने बोलवल्यास हजर राहावे, या अटीवर 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी हा जामीन मंजुर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऍड. पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुन्हयातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर सीबीआयने ऍड. पुनाळेकर यांना अटक केली होती. या सल्ल्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडीत शस्त्र तुकडे करुन फेकून दिल्याचा दावा सीबीआयने केलेला आहे. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवादानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)