विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा – घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी होणाऱ्या छळ कंटाळून विवाहितेने विष घेवून आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी तिच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. परंतू पोलिसांनी समजूत काढण्यानंतर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले.

श्रीगोंदा तालुक्‍यातील म्हाडूळवाडी येथील अश्विनी श्रीमंत घोडके (वय 20) या विवाहितेने विष घेवून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अशोक आबाजी घोडके (सासरा),कमल अशोक घोडके (सासू), श्रीमंत अशोक घोडके (नवरा),दत्ता अशोक घोडके (भाया), ज्योती दत्ता घोडके (जाऊ सर्व रा. महाडूंळवाडी) यांच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

मे 2018 मध्ये रावसाहेब घायमुक्ते यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह श्रीमंत यांच्याशी झाला. काही दिवस सुखाने प्रपंच सुरु होता. त्याच दरम्यान श्रीमंत घोडके यांना घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणावेत अशी अश्विनीकडे पैशाची मागणी सुरु झाली. अश्विनी हिने माहेरी जावून आपला छळ होत असल्याचे सांगितले. अश्विनीच्या वडिलांनी काही दिवसांच्या मुदतीनंतर पन्नास हजार रुपये नेऊन दिले. पैसे देवूनही अश्विनीचा छळ थांबला नाही.

काही दिवस गेल्यानंतर दुचाकीचे हप्ते भरण्यासाठी 25 हजार आणावेत, यासाठी तिचा छळ सुरु झाला. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यात आली. सतत होणाऱ्या मारहाणीने अश्विनी त्रस्त झाली होती. 3 ऑक्‍टोबर रोजी तिने विषारी औषध प्राशन केले. घरच्या मंडळीनी तिला उपचारासाठी नगर येथे दाखल केले, मात्र उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, सासरी सतत छळ होत असल्याने अश्विनीच्या माहेरचे नातेवाईक चांगले संतप्त झाले होते. घरासमोरच अंत्यविधी करायचा अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढत अंत्यविधी घरापासून बाजूला काही अंतरावर करण्याची विनंती केली. ती मान्य करत पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)