विहिरीच्या पाण्यासाठी गुणवाडीत दंगा

नगर – विहिरीवरील पाणी भरण्यावरून गुणवाडी (ता. नगर) येथे दंगा झाला आहे. लाठी, लोखंडी गजाने घरात घुसून मारामाऱ्या झाल्या आहेत. यशवंत गंगाधर शेळके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. बाळासाहेब भाऊसाहेब शेळके, प्रदीप बाळासाहेब शेळके, मुकुंद साहेबराव शेळके, मनोज सुभाष शेळके, राजेंद्र सुभाष शेळके (सर्व रा. गुणवाडी, ता. नगर) व विकासकाळे (रा. हिंगणी बेडी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या सात जणांच्या हल्ल्यात फिर्यादी यशवंत व त्यांची आई रत्नाबाई दोघे जखमी झाले आहेत. गुणवाडी (ता. नगर) येथे सामाईक विहीर आहे. या विहिरीतील पाण्यासाठी हा दंगा झाला. बाळासाहेब शेळके यांनी यशवंत शेळके यांच्या घरात घुसला आणि पाण्यासाठी आराडाओरडा केला. यानंतर बाळासाहेब यांच्यासह इतर सहा जण घुसले. त्यांनी काठी व लोखंडी गजाने काहीही न विचारता मारहाण सुरू केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण केल्यानंतर हे सात जण तेथून पसार झाले. नगर तालुका पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदविल्यावर या सात जणांविरोधात दंगा करून जबर मारहाण करणे, शिवीगाळ करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)