धक्‍का लागल्याचा बहाणा करून लुटले

पिंपरी -गाडीला धक्का लागल्याचा बहाना करून व आपण कस्टम ऑफिसर असल्याची बतावणी करत एका नागरिकाला लुटल्याची घटना भोसरी-चाकण रोडवर शुक्रवारी (दि.26) घडली. गोविंद पुरुषोत्तम नावरीकर (वय-43 रा. पुणे) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञात इसनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावरीकर हे घरी जात असताना दोन अज्ञात इसम बुलेट गाडीवरून आले व त्यांनी त्यांच्या गाडीला फिर्यादीच्या गाडीचा धक्का लागल्याचा बहाना करत वाद घालण्यास सुुरुवात केली. यावेळी आम्ही कस्टमचे अधिकारी असल्याचे बतावणी करत दंड म्हणून 3 हजार 400 रुपये घेत नावरीकर यांची फसवणूक केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)