पिंपरी -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरुणाला अटक केले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली असून फहीम भुरा खान (रा. बावधन) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही 16 वर्षाची आहे. तिचे व आरोपीचे प्रेमसंबंध होते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.