पिंपरी -जमिनीवीरल मालकी हक्काचा फलक काढण्यास मज्जाव केला म्हणून दोन आरोपींनी एका महिलेचा विनयभंग केला. दोन्ही आरोपी भाऊ-भाऊ आहेत. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास शंकर पवार (वय-38 रा. दिघी) व त्याचा भाऊ (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या बहिणीच्या नवऱ्याची मोशी येथील सर्व्हे क्रमांक 44/1/2 येथे चार गुंठे जमीन आहे. तिथे येऊन आरोपींनी तेथील मालकी हक्काचा फलक हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित महिला त्यांना विरोध कऱण्यास गेल्या असता दोन्ही भावांनी शिवीगाळ करत त्यांचे दोन्ही हाथ पकडून अश्लील वर्तन केले. यावरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.