कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज भाजप प्रवेशाच्या तयारीत

बाळा भेगडे यांचा दावा ः टाकवेच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा प्रवेश 

वडगाव मावळ – मावळतील पवना, आंद्रा, वडिवळे, टाटा ठोकळवाडी, जाधववाडी, कासारसाई आदी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न लवकरच सोडविणार असून त्यासाठी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसह चौथ्यांदा बैठक झाली आहे. मावळ तालुका भाजपमय झाला असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केला.

येथील भाजप तालुका कार्यालयात गुरुवारी (दि. 11) टाकवे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाला या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, ज्येष्ठ नेते गणेश भेगडे, जि.प. सदस्य नितीन मराठे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, संदीप काकडे, युवामोर्चा तालुका कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे, किरण राक्षे, राजेश मुऱ्हे, अजित आगळे, अमोल भेगडे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, संतोष कुंभार, महिंद्रा म्हाळसकर, किरण भिलारे, विक्रम वाजे, रमेश ढोरे, शेखर वहिले आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री भेगडे पुढे म्हणाले, मावळातील ग्रामपंचायतींच्या कार्यालय इमारत, स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना, रस्ते आदींचे प्रस्ताव सरपंच व ग्रामसेवक आदींनी त्वरित पाठविल्यास विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. टाकवे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच तुशांत उर्फ दादा ढमाले, उपसरपंच शांताराम गायकवाड व सदस्यां ज्योती ढमाले, मनीषा गरुड, शालिनी गरुड, सुवर्णा गायकवाड, ज्योती धुमाळ, सदस्य विजय गरुड व बाबासाहेब ओव्हाळ आदींनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यासाठी माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, अमोल भेगडे व महिंद्रा म्हाळसकर यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)