प्रचारावेळी कॉंग्रेस उमेदवार शशी थरूर जखमी

थिरुअनंतपुरम – प्रचार चालू असताना केरळमधील थिरुअनंतपुरम येथील मंदिरात पूजा करताना कॉंग्रेस नेते शशी थरूर जखमी झाले असून त्यांच्या डोक्‍याला इजा झाली आहे. त्यांच्या डोक्‍याला सहा टाके पडले आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान जखमी अवस्थेतील शशी थरृर यांचा फोटो समोर आला असून पिवळा कुर्ता घातलेला दिसत आहे. त्याच्या कुर्त्यावर रक्‍ताचे डागही दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शशी थरूर मंदिरात तुला करत असताना हा अपघात झाला. केरळमध्ये आज नववर्ष साजरा केला जात आहे. नववर्षाच्या निमित्ताने राज्यभरातील लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करत आहेत.

मंदिरात विधी सुरू असताना शशी थरूर जखमी झाले असता तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या डोक्‍याला सहा टाके लावण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शशी थरूर सलग तिसऱ्यांदा थिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून जिंकण्यास उत्सुक आहेत. त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)