वाहन योग्यता प्रमाणपत्रांची तपासणी बंद

जळोची – बारामती उपप्रदेशिक परिवहन कार्यालयालयाकडून वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी कोणतीही पूर्व सूचना व माहिती न देता अचानक बुधवारी (दि. 3) बंद करण्यात आली आहे. वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी अचानक बंद केली असल्याने वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी करण्यासाठी बारामती, दौड, इंदापूर या तीन तालुक्‍यातून 100 किलो मीटरच्या परिसरामधून आलेल्या वाहनधारकांना हेलपाटा पडला असून शेकडो रुपयांचे डीझेल खर्च होऊन आर्थिक भुरदंड सोसावा लागला असल्याचे खंत वाहन मालक-चालकांनी व्यक्‍त केली आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयाकडून बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार वाहनांना क्‍युआर कोडसह त्याचे सर्टिफिकेशन करणे बंधन कारक आहे. रिप्लेक्‍टिव टेप एमआयएस प्रणाली आहे. त्याप्रणालीवर फिटनेस द्यायचे आहे. त्यामुळे वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी थांबवण्यात आली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

रिप्लेक्‍टिव टेप बाबत परिवहन आयक्‍त कार्यालयाचे मंगळवारी (दि. 2) परिपत्रक आहे. त्यानुसार क्‍युआर कोडसह ते सर्टिफिकेशन करायचे आहे. व एमआयएस प्रणाली आहे. त्यावर त्याची नोंद केल्यानंतर वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
– संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)