सखल भागात पाणी साचले
नगर: शहरात आणि उपनगरात आज झालेल्या पावसाने धुवून काढले . दिवसभराच्या उकाड्या नंतर सायकाळी साडे पाचच्या सुमारास आभाळ भरुन आले सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या पाठोपाठ जोरदार पावसाच्या सरी बरसू लागल्या पावसास सुरवात होताच वारा थांबल्याने पाऊस संततधार बरसला तो थेट तासभर.
साडेपाचच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसांमुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले घरी जायच्या तयारीत असलेली चाकरमानी मंडळी कार्यालयारच अडकून पडली मात्र त्या बाबत त्यांची तक्रार नव्हती पावसाळा सुरू झाल्याचा आनंदच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे दोन दिवसांच्या अंतराने पडलेल्या पावसाचे नगरकरांनी स्वागतच केलेअसे म्हणायला हरकत नाही.
पावसाने शहरातील सखल भागात चांगलेच पाणी साठले. त्यात न्यु आर्टस कॉमर्स महाविद्यालया जवळील रस्त्यात नेहमी प्रमाणे पाणी साचले तेथील गटारीतून बाहेर येणाऱ्या पाण्यातून वाहनांना वाटकाढरांना चांगलीच कसरत करावी लागत होती. शहरातील चितळे रस्ता ,लक्ष्मी कारंजा , गांधी मैदान, जिल्हा वाचनालया समोरील रस्ता ,नेता सुभाष चौक, तेलीखुंट,घुमरे गल्ली पटवर्धन चौल या भागात गुडघाभर पाणी साठले होते. आज झालेल्या तासभराच्या पावसाने कोणतेही नुकसान न होता फक्त रस्ते धुवून निघाले. या भागातील पाणी सरे पर्यंत सुमारे तासभर वेळ लागला. तर उपनगरांमध्ये सावेडी परीसरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून काम झाल्या नंतर त्यांची डागडुजी न केल्याने त्या खड्यात पाणी साठून डबकी तयार झाल्याचे पहायला मिळाले. या डबक्यातून वाट काढतांना वाहन चालकांची मोठी त्रेधा उडत होती. मात्र या पावसानंतर पुन्हा एकदा वीजेचा खेळ कंडोबा सुरू झाल्याने सावेडी उपनगरात आणि शहरात सुद्धा काहिकाळ अंधारातच कष्ढावा लागला. साडेपाच वाजल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत वीजपुरवठा खंडीत होता. तासाभरानंतर पुन्हा उन्हाची तिरीप दिसु लागली. त्याच्याविरुद्ध दिशेला इंद्रधनुष्य अवतरल्याने बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.