भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

कोल्हापूर – पक्ष श्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी तयारी असते, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष पदाची माळ दादांच्या गळ्यात पडणार अशी जोरदार चर्चा आहे.त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी केलेले हे वक्तव्य खूप महत्वाचे मानले जात आहे.

कोल्हापूर येथील शेंडा पार्कातील कृषी संशोधन केंद्राच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या “शेतकरी सन्मान भवन’ इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज, गुरुवारी सकाळी झाले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत सूतोवाच केले.

सध्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारणा केली असता, पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे सुचक वक्तव्य केले. पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.