बारामती तालुक्यात ‘रेशनिंग’चा काळाबाजार; गुन्हे शाखेच्या कारवाईत मोठा साठा जप्त

बारामती – वडगाव निंबाळकर येथे बारामती गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेशनिंगचा सुमारे ६ लाख ७१ हजारांचा धान्य साठा जप्त केला. या कारवाईत ६ लाखांचा टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. सौरभ सुधीर शहा, सुधीर जवाहरलाल शहा (रा. वडगाव निंबाळकर), अक्षय मुथा, जाफर शेख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापैकी सौरभला अटक करण्यात आली. बारामती गुन्हे शाखेच्या संदीप जाधव यांना यासंबंधी माहिती मिळाली होती. त्यानुसार अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.

वडगावातील या गोदामात रेशनिंगचा गहू, तांदूळ व साखर रेशन दुकानदारांकडून घेवून त्याची सरकारी पोती बदलून ती नव्या पोत्यात भरून विक्रीसाठी साठा तयार केला जात होता. तसेच आयशर टेम्पोमध्येही काही माल भरण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा १५ हजार किलो गहू, २ लाख ७० हजार रुपये किमतीचा १३, ५०० किलो तांदूळ, ८, ७५० रुपयांची २५० किलो साखर, ४७, ६३० रुपयांची रोख रक्कम, तसेच ६ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, दहा हजार रुपये किमतीचा वजन काटा, पाच हजार रुपये किमतीचे पोते सील करण्याचे मशिन, ११६ सरकारी रिकामी प्लास्टिक पोती, ५२ खाकी रंगाची सरकारी बारदान पोती असा १२ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)