भाजपने स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची वेस्ट सिटी केली- अजित पवार

अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले खडे बोल

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहर बेस्ट सिटी होती. त्यानंतर स्मार्ट सिटी झाली आणि आता सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीचे वेस्ट सिटी केल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिंमडळ पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याची निविदा आधी मंजूर, मग रद्द आणि नंतर पुन्हा मंजूर करून घोळ घातला. जनतेचं हित पाहिल गेल नसल्यानं शहर कचऱ्यात गेलं, सलग दोन वर्षे स्वच्छ भारत अभियानात शहारची घसरगुंडी होत आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले. पालिका शहरातील १५-१५ दिवस कचरा उचलत नाही. नवीन गाड्या घेऊन देखील कचरा समस्या मार्गी लागली नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे असे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)