लोहमार्ग विमानतळावर विदेशी चलनाची तस्करी करणारे दोघे जेरबंद

कस्टम विभागाची कारवाई : 35.41 लाखाचे विदेशी चलन जप्त

पुणे- विदेशी चलनाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना लोहगाव येथील पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून सौदी अरेबियाचे “रियल्स’ हे 35 लाख 41 हजार रुपयांचे चलन जप्त करण्यात आले आहे.

बालाजी मुस्ताफुर आणि मयुर भास्कर पाटील अशी त्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही स्पाईस जेट विमनातून 16 जुलै रोजी प्रवास करणार होते. त्यावेळी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅग़ेची झडती घेतली. त्यामध्ये विदेशी चलन आढळले. चौकशीमध्ये त्यांनी हे चलन आपले नसून, दुबई येथे कोणाला तरी देण्याकरिता दिल्याचे सांगितले.

मात्र, ते विदेशी चलनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असल्याची कस्टम अधिकाऱ्यांना खात्री आहे. दोघांवर विदेशी चलन विनिमय भंगाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या डेप्युटी कमिशनर उषा भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सुप्रिडंट विनिता पुसडेकर आणि संजय झरेकर तपास करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)