#CWC2019 : कांगारूंना धक्का देण्यासाठी इंग्लंड उत्सुक

स्थळ – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

वेळ ः दु.3 वा.

बर्मिंगहॅम – विश्‍वविजेतेपदावर पाच वेळा नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियावर मात करण्यासाठी इंग्लंड उत्सुक झाला आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा ते कसे लाभ घेतात याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे. या दोन्ही पारंपरिक संघांमध्ये होणारी ही उपांत्य लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.

इंग्लंडच्या तुलनेत ऑस्ट्रेलियास विश्‍वचषक स्पर्धेतील बाद फेरीचा जास्त अनुभव आहे. जरी या स्पर्धेपूर्वी झालेल्या बारा सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला असला तरी, येथील विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच शिरजोर ठरला आहे. त्यातही हा सामना त्यांनी 64 धावांनी जिंकला होता. त्यामुळे कांगारूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे.

डेव्हिड वॉर्नर हा अतिशय धोकादायक फलंदाज मानला जातो. त्याचा प्रत्यय त्याने या स्पर्धेत सातत्याने दिला आहे. कर्णधार ऍरोन फिंच यालाही सूर सापडला आहे. नॅथन कोल्टिअर नील, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्‍सवेल यांच्याकडूनही फलंदाजीत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, पॅट कमिन्स, मार्कस स्टोईनिस यांच्यावर त्यांच्या गोलंदाजीची मदार आहे.

साखळी सामन्यातील पराभवाची परतफेड करण्यासाठी इंग्लंड कसोशीने प्रयत्न करणार अशी आशा आहे. मात्र, त्यासाठी त्यांना क्षमतेच्या शंभर टक्के कौशल्य दाखवावे लागणार आहे. पहिल्या फळीतील फलंदाजांकडून भक्कम पाया रचला जाईल अशी त्यांना खात्री वाटत आहे.

मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस या गोलंदाजांना कसे सामोरे जायचे याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर जेसन रॉयने फलंदाजीत सातत्य दाखविले आहे. जॉनी बेयरस्टो व बेन स्टोक हे सध्या अतिशय फॉर्ममध्ये आहेत. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी आत्मविश्‍वासाने खेळ करण्याची गरज आहे. गोलंदाजीत ख्रिस वोक्‍स, मार्क वुड व लियाम प्लंकेट यांच्यावर त्यांची भिस्त आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, अलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झंपा, राखीव खेळाडू- मॅथ्यु वेड, मिचेल मार्श.

इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेयरस्टो, जेम्स विन्स, बेन स्टोक्‍स, मोईन अली, जोफ्रा आर्चर, टॉम करन, लायन डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, ख्रिस वोक्‍स, मार्क वुड.

ऑस्ट्रेलिया-बलस्थाने

-पाच वेळा विश्‍वविजेतेपद, साहजिकच अंतिम फेरीचा गाढा अनुभव
-डेव्हिड वॉर्नर, ऍरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ यांचे सातत्यपूर्ण यश
-मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस यांचा प्रभावी मारा
-साखळी लढतीत इंग्लंडवर सहज विजय

कच्चे दुवे

-साखळी गटातील दोन सामन्यांमधील पराभवाचे दडपण
-खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या समस्या. उस्मान ख्वाजाची अनुपस्थिती
-मधल्या फळीतील फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरीचा अभाव
-फिरकी माऱ्यापुढे खेळण्याचा कमकुवतपणा

इंग्लंड-बलस्थाने

-जेसन रॉय व जॉनी बेयरस्टो यांची सातत्यपूर्ण कामगिरी
-घरच्या मैदानावर व वातावरणात खेळण्याचा फायदा
-स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा
-बेन स्टोक हे प्रभावी अस्त्र

कच्चे दुवे-

-घरच्या मैदानावर खेळताना येणारे दडपण
-मधल्या फळीत भरवशाचा अभाव
-विश्‍वचषकात खेळताना नकारात्मक वृत्ती
-फिरकी माऱ्यापुढे खेळण्याचा कमकुवतपणा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)