अरुण जेटलींची मोदींना चिट्ठी; कोणत्याही मंत्रीपदाचा कार्यभार न देण्याची केली विनंती

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांनी नव्या मंत्रिमंडळात आपल्यावर कोणत्याही मंत्रीपदाचा कार्यभार सोपवला जाऊ नये अशी विनंती नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अरुण जेटली यांनी याबाबत नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले असून आपली शारीरिक स्थिती बरी नसल्याने आपल्यावर तूर्तास तरी कोणत्याही मंत्रीपदाची जबाबदारी सोपवू नये अशी विनंती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अरुण जेटली यांच्या आजारपणाच्या बातम्या प्रसिद्ध होत असून यापूर्वीदेखील माध्यमांमध्ये अरुण जेटली मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र आता अरुण जेटली यांनीच नरेंद्र मोदी यांच्याकडे मंत्रिमंडळ न सोपविण्याची विनंती केली असल्याने माध्यमांमधील अरुण जेटली यांच्या आरोग्याबाबतच्या बातम्यांना दुजोरा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)