पुणे – 750 रिक्षाचालकांची कागदपत्रे आरटीओमध्ये सादर

वर्षाअखेरपर्यंत रिक्षा परवाना देण्यासाठी मोहीम

पुणे – ऑनलाइन अपॉईंटमेंट 2020 साली मिळालेल्या रिक्षाचालकांना या वर्षाअखेरपर्यंत रिक्षा परवाना देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष मोहीम घेण्यात आली होती. याअंतर्गत 13 मे ते 17 मे या कालावधीमध्ये सुमारे 400 रिक्षाचालकांनी कार्यालयामध्ये कागदपत्रे सादर केली आहे. तर संपूर्ण मेमध्ये सुमारे 750 जणांनी कागदपत्रे सादर केली.

नव्याने रिक्षा परवाना काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर 2020 ची अपॉईंटमेंट मिळत आहे. यामुळे रिक्षा परवान्यासाठी महिनोंमहिने वाट पाहवी लागणार आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांना वाहन परवाना (परमिट) देण्यास विलंब होत असून प्रलंबित अर्जांच्या संख्येत वाढ होत आहे. लवकरात लवकर रिक्षाचालकांना परवाना देता यावा, यासाठी कार्यालयामार्फत एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

आरटीओकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सध्या तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच जुलै 2019 ची अपॉईंटमेंट मिळालेल्या रिक्षाचालकांची कागदपत्रे जमा करुन घेण्याचे काम सुरू आहे. ही कागदपत्रे सादर करण्यासाठी अर्जदारांनी सकाळी 10.30 ते 12.00 वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार संगम पुलाजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.