भाजप आमदारांचे दोनदा मतदान करण्याचे आवाहन

नवी मुंबई – भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला दिला आहे. या वक्तव्याविरोधात मंदा म्हात्रे यांच्यावर निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा सल्ला मंदा म्हात्रे यांनी दिला होता. कोपरखैरणे येथे युतीच्या  माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

https://twitter.com/ANI/status/1117618335124992001

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)