रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच लेक कोमो येथे गेले होते. या ठिकाणी ते कशासाठी गेले याबाबत तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह यांचा राजेशाही विवाह मोठ्या थाटाने लेक कोमो येथे पार पडल्यानंतर हे ठिकाण म्हणजे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
रणबीरचे वडील अभिनेते ऋषी कपूर आजारातून बरे झाल्यानंतर त्वरित आलिया आणि रणबीर विवाहबद्ध होणार असल्याचेही म्हटले जात आहे. ऋषी कपूर यांचे बंधू अभिनेते रणधीर कपूर यांनीही ऋषी आजारातून संपूर्णपणे बरे झाले असल्याची पोस्ट सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली होती.
उपचार पूर्ण झाल्यानंतर ऋषी कपूर भारतामध्ये परतल्यावर त्वरित आलिया आणि रणबीरचा विवाहसोहळा आयोजित होणार असल्याचे समजते. अशातच रणबीर आणि आलिया यांचे इटलीला जाणे हे विवाहाच्या तयारीसाठी असल्याचे म्हटले जात आहे. आलिया आणि रणबीर सध्या आपल्या कामांच्या व्यस्त शेड्युल्समधून वेळ काढून युरोपमध्ये फिरायला गेले असून, इटलीतील लेक कोमो या ठिकाणी ते निश्चित कोणत्या कारणासाठी गेले असावेत, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.