शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारा

आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्‍तांकडे मागणी  

पिंपरी – शहरातील 1000 चौरस फुटांपुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवासी, वाणिज्य, औद्योगिक बांधकामांचा शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारण्यात यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी पालिकेकडे केली आहे.

तसेच नागरिकांना पाठविलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्यात. त्याबाबतची कारवाई थांबवावी व अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याबाबत महासभेत ठराव करुन राज्य शासनाला पाठवावा, अशी सूचनाही लांडगे यांनी केली.

आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. महापौर राहुल जाधव, यांच्यासह संदीप बेलसरे, सुरेश म्हेत्रे, राजेंद्र लांडगे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर व बाधित नागरिक उपस्थित होते.
महेश लांडगे म्हणाले, पूर्वीप्रमाणे पालिकेने “सॉफ्टवेअर’मध्ये बदल करावा. शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारण्यात यावा. मुळ कराचा भरणा करुन घेतल्यास नागरिक नियमितपणे कर भरतील, तसेच लघुउद्योजकांकडून देखील मूळ मिळकत कर स्वीकारण्यात यावा. व नोटीसांची कारवाई तात्काळ बंद करावी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)