#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच!


चवीने खाणाऱ्यांसाठी पुणे-नाशिक महामार्गावर “हॉटेल आसरा लंच होम’ एक पर्वणी आहे. या हॉटेलमध्ये गावरान तुपातील अस्सल बिर्याणी खाण्यासाठी पुणे-नाशिक-मुंबई आदी परिसरातून प्रवासी, नागरिक आणि खेड आंबेगाव, शिरूर या तालुक्‍यांतील नागरिक आवर्जून येतात. घरगुती कौशल्याने बनविलेली दमबिर्याणी फक्‍त हॉटेल “आसरा’मध्येच मिळते. त्यांची कोठेही शाखा नसल्याने चवीने दमबिर्याणी खाणाऱ्यांची येथे नेहमीच वर्दळ असते.

शून्यातून निर्माण केलेले हॉटेल “आसरा’ खवैय्यांचा “आसरा’ बनले आहे. नुकतेच या हॉटेलचे नूतनीकरण केल्यानंतर ग्राहकांना आवश्‍यक सर्व सुविधा देत सुरू केले आहे. टेबलची संख्या जास्त असल्याने व मुबलक जागा असल्याने ग्राहकांना आवडीचे हे ठिकाण बनले आहे. हॉटेलचे मालक सुभाष सखाराम थिगळे आणि योगेश दत्तात्रय थिगळे हे स्वतः 30 वर्षांपासून हॉटेल सांभाळत असून हॉटेल आणि आलेल्या ग्राहकांकडे वैयक्तिक लक्ष दिले जात असल्याने ग्राहकांना तत्पर सेवा दिली जात आहे. हॉटेल मालकाचा मनमिळावू स्वभाव दमबिर्याणी खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांना भावतो. तर हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर आखाड पार्टीसाठी प्रशस्त जागा व चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.

“या’ पदार्थांची चव निराळीच 
खास बोल्हाईचे मटण, गावरान तुपात तयार केलेली स्पेशल दमबिर्याणी, स्पेशल मटण थाळी, स्पेशल चिकन थाळी, मटणफ्राय अन्‌ सोबतीला खास भाकरी या खास “मेनूं’ची चव कायमच जिभीवर राहात असल्याने “हॉटेल आसरा लंच होम’ हे उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण झाले असल्याने खवैय्यांनी फॅमेली आणि मित्रांसमवेत या हॉटेला भेट दिलीच पाहिजे. स्वादिष्ट रूचकर पदार्थ तर खास दमबिर्याणी खाण्यासाठी दूरवरून खवैय्ये येथे येतात.

अगदी माफक दर 
अंतर्गत स्वच्छता 
मुबलक कर्मचारी 
तत्पर सेवा 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)