गडदुबाईदेवी डोंगरावर पर्यटकांची गर्दी

चासकमान – खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात दमदार पाऊस कोसळत असल्याने भीमाशंकर, भोरगिरी, चास, कमान, वाडा आदी ठिकाणच्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यातच रविवार सुट्टीचा दिवस आला की गर्दी अधिक होत आहे.

वाडा येथून अवघ्या 5 कि.मी अंतरावर असणाऱ्या प्राचीन गडदुबाईदेवी मंदिर परिसरात या पर्यटकांची गर्दी होत आहे. हे मंदिर उंच डोंगरावर असल्यामुळे डोंगरावरून कोसळणारे पाणी अंगावर झेलण्यासाठी पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देत आहेत. हे मंदिर पूर्वी कमी जागेत होते. मात्र, भाविक व पर्यटकांची वाढती गर्दी बघून दगड कोरून पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी जागा वाढवली असल्याने पर्यटक येथे पाणी झेलण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)