कवठे-मलठण रस्ता खड्ड्यांत

सविंदणे – शिरूर-मंचर महामार्गावरील कवठे-मलठण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य परसले असून दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना वाहन चालवताना मोठा नाहक त्रास होत आहे.

शिरूरवरून मंचर, नारायणगाव, आळेफाटा जाण्यासाठी हा सोपा मार्ग आहे; परंतु या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक छोटेमोठे अपघात होत आहेत. रांजणगावपासून मलठण कवठे, पारगाव, नारायणगाव मार्गे ओझर, लेण्याद्री या ठिकाणी अष्टविनायकाला जाण्यासाठी व बेल्हा-जेजुरी महामार्ग हे रस्ते मंजूर झाले आहेत; परंतु हे काम फार संथ गतीने सुरू असून रस्ते खोदून ठेवले आहेत. तोपर्यंत हे खड्डे रस्ते बांधकाम विभागाने बुजवायचे की सबंधित ठेकेदाराने? या वादात रस्ता तसाच राहिल्याने खड्डे बुजवले नाहीत. लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी येथील परिसरातील वाहनचालकांकडून होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.