डोंगरी इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

जखमींना 50 हजारांची मदत : मृतांचा आकड 14
मुंबई –
डोंगरीत केसरबाई इमारत कोसळून मंगळवारी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांता मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

डोंगरी दुर्घटनेतील जखमींना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.