नवी दिल्ली – सध्या देशभरामध्ये भाजपची ऐतिहासिक वाटचाल असून, भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या निमित्ताने दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करण्याकरिता पंतप्रधान नरेद्र मोदी आणि अमित शहा यांनी सभेचे आयोजन केले आहे.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेचे आभार मागितले असून, हा विजय स्वातंत्र्या नंतरचा जगातील सर्वात मोठा विजय आहे. देशातील सर्व स्तरातील कामगारांनाचा आणि शेतकऱ्यांचा तसेच सर्वसामान्य नागरिकांचा हा विजय आहे. आजच्या निकालामुळे देशातील संपूर्ण इतिहास बदलून टाकला असल्याचे देखील मोदींनी म्हंटले आहे. दरम्यान, मोदींनी निवडणूक आयोगाचेही आभार मानले. निवडणूक आयोग, सुरक्षा दलांना, ही निवडणुकीची व्यवस्था सांभाळणाऱ्या प्रत्येकाला उत्तम प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो, असं देखील ते म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1131569459410350080