नाशिक: 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला आहे.
हेमंत गोडसेंनी या निवडणुकीत आपलाच विक्रम मोडला आहे. मागील निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा 1 लाख 87 हजार मतानी केला होता पराभव केला होता. या निवडणुकीत हेमंत गोडसेंना 4 लाख 30 हजार 8 मतं मिळाली, तर समीर भुजबळ यांना 2 लाख 21 हजार 355 मतं मिळाली.