पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहा, अन्यथा परिणाम भोगा

संग्रहित छायाचित्र....

भाजपकडून पदाधिकाऱ्यांना इशारा

नवी दिल्ली : देशातील पक्षाच्या मजबूतीसाठी भारतीय जनता पक्ष सध्या राष्ट्रीय स्तरावरून काम करत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी सध्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या विचारधारेविषयी सांगण्यात येत आहे. विचारधारेशी प्रामाणिक राहा, अन्यथा परिणाम भोगा, असा स्पष्ट इशारा भाजपकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. सध्या भाजपाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारधारेबद्दल मार्गदर्शन दिले जात आहे. विचारधारेच्या विरोधात गेल्यास पदावरुन हटवण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना भाजपाकडून प्रशिक्षणादरम्यान दिल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षकांकडून भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांचे उदाहरण देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान अडवाणींच्या 2005 च्या पाकिस्तान दौऱ्याची आठवण करुन दिली जात आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना धर्मनिरपेक्ष म्हटल्याने अडवाणी यांना भाजपाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते, हा संदर्भ भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला जात आहे. पक्षातील कोणतीही व्यक्ती विचारधारेपेक्षा श्रेष्ठ नाही, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष जे. पी. राठोड यांनी मार्गदर्शन शिबिरातील अडवाणींच्या उल्लेखावर भाष्य केले. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर झालेल्या कारवाईचा संदर्भ देऊन विचारधारेचे महत्त्व पटवून दिले जात असल्याचे राठोड म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)