जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले

कामशेत, (वार्ताहर) – पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर कामशेत परिसरातील ताजे आणि परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

कामशेत परिसरात हॉटेल, ढाबे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथे लोक रात्री जेवणासाठी थांबतात. त्यामुळे हायवेवर रात्रीही गर्दीच असते. त्यामुळे लोक वाहने बाहेर थांबवून जेवणासाठी हॉटेलमध्ये जातात. मग याच संधीचा फायदा घेऊन गाडीतील मौल्यवान वस्तू चोरीस जातात. त्यामुळे या प्रकारात वाढ झालेली आहे, याची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.

चोरी करणारे अनेक चोर पोलिसांच्या तावडीत सापडत नसल्याने त्यांच्या कामावर प्रश्‍न चिन्ह उभे राहत आहे. दि. 25 ला कर्नाटकमधील एका प्रवासाचे वाहन (केए 25 सी 8021) बसमधून सोने आणि 10 लाख 30 हजार रुपये पैसे असलेली बॅग चोरीस गेली. असे प्रकार वारंवार घडत असून त्याची तपासणी होऊन योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)