भुवनेश्वर : एफआयएच प्रो-लीग हाॅकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत यजमान भारतीय संघाला गतविजेत्या आॅस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असणा-या आॅस्ट्रेलियाने भारताचा ४-३ असा पराभव करत विजय नोंदविला.
FT: 🇮🇳 3-4 🇦🇺
An hour full of excitement and a great game of Hockey comes to an end! 🏑
Congratulations, @Kookaburras on the win. See you tomorrow! 😎#IndiaKaGame #FIHProLeague #INDvAUS #HockeyInvites #HockeyAtItsBest pic.twitter.com/4pDGwZGKZb
— Hockey India (@TheHockeyIndia) February 21, 2020
आॅस्ट्रेलियाकडून डायलन वूदरस्पूनने ६ व्या मिनिटाला, टाॅम विखमने १८ व्या मिनिटाला तर जेकब अँडरसन याने ४२ व्या मिनिटाला गोल केले.
भारतीय संघाकडून राजकुमार पालने ३६ व्या आणि ४७ व्या मिनिटाला दोन गोल केले तर रूपिंदरपालसिंगने ५२ व्या मिनिटाला एक गोल केला.
या विजयानंतर आॅस्ट्रेलियाचे गुणतालिकेत पाच लढतींनंतर ९ गुण झाले असून ते तिस-या स्थानी पोहचले आहेत. तर, भारताचे पाच लढतीनंतर ८ गुण झाले आहेत.