डिकसळ-सध्याच्या इंग्लिश मीडियम स्कुलच्या जमान्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे, त्यामुळे आता पालकवर्गाचा कल जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळत आहे. पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी केले. डिकसळ (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेस सदिच्छा भेट दिली.
या भेटीत माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील समस्या, शिक्षक-कर्मचाऱ्यांना भेडसावत असणारे प्रश्नांची माहिती करून घेत शाळा इमारतीची पाहणी केली. यावेळी माझ्यासह मुख्याध्यापक देवानंद शेलार, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, इतर ग्रामस्थ व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.