रेडा-शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील संतोष रामहरी सावंत (वय 42)हे केंद्रीय राखीव पोलीस दलातील सेवेत कार्यरत होते, त्यांचे नुकतेच आसाम त्रिपुरा येथे आकस्मित निधन झाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धनमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाकडून सर्व मदत सैनिक संतोष सावंत यांच्या कुटुंबियांना केली जाईल, असा शब्द यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.