मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटर्सशी लग्न केले आहे. अभिनेत्री हेजल कीच हे त्यातीलच एक नाव. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत काम केल्यानंतर हेजलने क्रिकेटपटू युवराजसोबत विवाह केला. नुकतंच हेजलने आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. युवराजने देखील पत्नी हेजलला आपल्या अनोख्या स्टाईलने शुभेच्छा दिल्या.
हेजलने 30 नोव्हेंबर 2016 रोजी युवराजशी लग्न केले याआधी बराच काळ दोघेही रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते. एका मुलाखतीत युवराजने सांगितले की, हेजलला डेटसाठी विचारण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली होती. युवराजने मोठ्या धुमधडाक्यात पत्नी हेजलचा वाढदिवस साजरा केल्याचे समजते. यासोबतच युवीने पत्नीला खास गिफ्ट देखील दिल्याचे समजते. याचे काही फोटो हेजलने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘थँक्यू हजबंड माझ्यासाठी तयार केलेलं हे सर्वात सुंदर कार्ड आहे’ अशा कॅप्शनखाली हेजलने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये युवीने दिलेले ग्रीटिंग कार्ड आणि कोलार्ज केलेले काही फोटो पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
युवराजने देखील आपल्या सोशल मीडियावरून हेजलला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने हेजलच्या काही अनसीन फोटोंचा व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. दोघांच्याही फॅन्सने या व्हिडिओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
युवीने सांगितलं होता डेटचा किस्सा
क्रिकेटर युवराज सिंहने एका शो दरम्यान दोघांच्याही लव्ह स्टोरीचा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की जेव्हाही तो हेजलला कॉफी डेटसाठी विचारायचा तेव्हा ती हो म्हणायची, पण डेटच्या दिवशी ती तिचा फोन बंद ठेवायची आणि भेटायलाही येत नव्हती. मात्र त्यानंतर काही वेळ एकत्र घालवल्यानंतर युवराजने हेजलला प्रपोज केले आणि हेजलनेही होकार दिला.