माळेगाव, (वार्ताहर)- बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पहिल्या फलकाचे युगेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवक वर्गाचा युगेंद्र पवार यांना तुफान प्रतिसाद मिळाला.
माळेगाव येथे पवार यांनी नव्याने उभारण्यात येत असलेल्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्थवस्थता होती. अजित पवार विरूद्ध संपूर्ण कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठिशी एकवटले. त्यामुळे युगेंद्र पवार हे तालुक्यात सक्रिय झाले आहेत. युवक वर्गाचा प्रतिसाद मिळत आहे. याचा प्रत्यय माळेगावात दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पहिल्या फलकाचे उद्घाटन युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युगेंद्र पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, तरूणांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाचा वतीने तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या नगर पंचायत माळेगाव येथे सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस जयपाल भोसले यांनी पक्षाचा नामफलक उभारला आहे. युगेंद्र पवार यांनी गावात फेरी काढून शक्तीप्रदर्शन केले आहे.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, संदीप गुजर, प्रशांत बोरकर, अमित तावरे, केशव भोसले, मयुर भोसले, नितीन तावरे, प्रताप सातपुते, भारत कदम, पप्पू गोफणे, अक्षय भोसले, प्रदीप जगदाळे, प्रमोद करचे, युवक, नागरिक उपस्थित होते.