कराड – कराड-चिपळूण मार्गावर वारुंजी, ता. कराड गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास ट्रक व दुचाकीचाअपघात होऊन, दुचाकीवरील निखिल हणमंत जाधव (वय 19, रा. म्होप्रे, ता. कराड) हा युवक जागीच ठार झाला.
याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, निखिल जाधव हा दुचाकीवरून कराडकडून म्होप्रे या आपल्या गावी गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास निघाला होता. त्यावेळी कराडकडून पाटणकडे निघालेला ट्रक वारुंजी गावच्या हद्दीत खुशबू हॉटेलसमोरील डिव्हाडरपासून यू टर्न घेत होता. त्यावेळी पाठीमागून आलेली निखिलची दुचाकी ट्रकखाली सापडली.
यामध्ये निखिलच्या डोक्याला गंभीर मार लागून, त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक तेथेच सोडून पलायन केले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.