नांदेड – डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. चूकीचे इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
प्रजापती लांडगे असे या तरुणीचे नाव आहे. ती नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे राहत होती. नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात ती शिक्षण घेत होती. 18 मे रोजी नर्सिंग कॉलेजमध्ये असताना तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी आणि अधिकाऱ्यांना सांगितली. याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
प्रजापतीला प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी तिला ताबडतोड विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारदरम्यान १९ मे रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका तरुणीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. मागील चार दिवसांपासून तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवागृहात असल्याने अनेकजण यावर संताप व्यक्त करत आहेत.