पोर्ट मोरेस्बी – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मोदींना फिजीने त्यांच्या वैश्विक नेतृत्वासाठी ‘कम्पेनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्वासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. फिजीचा सर्वोच्च सन्मान क्वचितच इतर देशातील व्यक्तीला दिला जातो.
फिजीने पंतप्रधान मोदींना ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ हा सन्मान दिला. त्यानंतर पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान मोदींना ‘द ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. याबाबत ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा सन्मान फक्त माझा नाही, तर भारतीयांचा आहे, भारत आणि फिजीचं जुनं नातं आहे. त्याबद्दल सितिवेनी राबुका आणि राष्ट्रपतींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”
Grateful to the people and Government of Fiji for conferring the Companion of the Order of Fiji on me. I thank PM @slrabuka for presenting the award. It is an honour for the people of India and a recognition of the strong ties between India and Fiji. pic.twitter.com/rhUPrE0Nvu
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2023
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत तुमचा विकासातला सहकारी आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. कोणतीही मानवी सहाय्यता असो अथवा विकास असो तुम्ही भारताकडे एक विश्वासू सहकारी म्हणून पाहू शकता. आम्ही आमचा अनुभव आणि क्षमता तुमच्यासोबत शेअर करायला तयार आहोत. कोणत्याही संकोचाशिवाय आम्ही हे करू.”
Humbled by the gesture of Papua New Guinea of conferring me with the Companion of the Order of Logohu. Gratitude to Governor General Sir Bob Dadae for presenting the award. This is a great recognition of India and the accomplishments of our people. pic.twitter.com/VDhqTJK6Ra
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2023
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे काल मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मोदींचं स्वागत करताना जेम्स मारापे यांनी मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.