भवानीनगर येथे रक्तदान, आरोग्य शिबिर
भवानीनगर – तरुणांनी सामाजिक कार्या बरोबर स्वतःचा आर्थिक उत्पन्नाचा मार्ग निवडला पाहिजे. सामाजिक कार्यासाठी पैशांची देखील गरज लागते यामुळे तरुणांनी सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक कार्यांमध्ये भाग घ्यावा; परंतु डोळ्यासमोर कोणतेतरी उद्दिष्टे ठेवून सामाजिक काम करू नये. मनापासून खऱ्या अर्थाने समाजासाठी आपण काहीना काही देणे लगतो याचा विचार करून सामाजिक कार्य करावे, असे मत शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथे पार्थ पवार व युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पना प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले याचे उद्घाटन शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, सणसरचे सरपंच व छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ऍड. रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर,
इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, संजयभैय्या निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ, सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते, हेमंत निंबाळकर, विक्रम निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, वसंतराव जगताप, जितेंद्र काटे, बाबाजी निंबाळकर, पार्थ निंबाळकर, यशवंत नरुटे, युवासेनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष पिंटू गुप्ते, सागर भोईटे, अमोल भोईटे, विजय शिरसट, शब्बीर काची आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये 92 नागरिकांनी तपासणी केली तसेच 47 ईसीजी व 86 नागरिकांचे डोळे तपासणी करण्यात आली. 132 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. या भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन संकल्पना प्रतिष्ठानचे सिद्धार्थ निंबाळकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले होते.