लखनौ – यूपीच्या बाराबंकी जिल्ह्यात चारा कापण्याच्या मशीनमध्ये अडकल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रदीप (वय 21, रा. कल्लीपुरवा, बाराबंकी) असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला.
प्रदीप ट्रॅक्टरमध्ये चारा यंत्र बसवून पेंढा कापत होता. अचानक तो चारा कापण्याच्या मशीनमध्ये अडकला. मशीनमध्ये अडकताच प्रदीपचे डोके शरीरापासून वेगळे झाले. वर्षभरापूर्वीच मयत प्रदीपचा विवाह झाला होता. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबासह सासरच्या मंडळींवर शोककळा पसरली आहे. बाराबंकी जिल्ह्यात शेतकरी आपल्या पशुधनाला खायला देण्यासाठी यंत्राने भाताचा पेंढा कापतात. पेंढा कापण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागे मशीन जोडून चारा कापला जातो.
चारा कापत असताना मशिनमध्ये काही बिघाड झाली होती, ती दुरुस्त करण्यासाठी प्रदीपने चारा यंत्राच्या ब्लेडवरील झाकण काढून ते पाहण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याला मशिनच्या ब्लेडने जबर मार लागल्याने त्याचे डोके शरीरापासून वेगळे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.