पिंपरी – दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 3 जुलै रोजी दुपारी काळेवाडी येथे घडली. ज्ञानेश्वर सुरज दूधभाते (वय 27 रा. निर्मल कॉलनी, रहाटणी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सहाय्यक पोलीस फौजदार बिरादार यांनी रविवारी (दि. 11) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 3 जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर दुचाकीवरून जात असताना दुचाकी मेट्रो हॉस्पिटलच्या पुढे नखाते पेट्रोल पंपासमोर त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.