“माझ्या प्रिय मित्रा तू हे सिद्ध करून दाखवलं…’ कमल हसन यांनी दिल्या थलैवाला शुभेच्छा!

नवी दिल्ली – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांना २०१९ या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, रजनीकांत यांना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते ‘कमल हासन’ यांचा सुद्धा समावेश आहे. कमल हासन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रजनीकांत यांचे अभिनंदन केले आहे.

कमल हासन म्हणतात… “माझा प्रिय मित्र आणि सर्वोच्च स्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील अतिशय मानाचा असा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर केल्याने मला फार आनंद झाला आहे… रजनी यांना हा पुरस्कार १००% योग्य आहे, ज्याने हे सिद्ध केले आहे की, स्क्रीनवर दिसून चाहत्यांवर विजय मिळवा” या आशयाचे ट्विट कमल हासन यांनी केलं आहे.

सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. रजनीकांत हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.