लखनौ – आमच्या पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. आमच्या फोनचे रेकॉर्डिंग मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ हे रोज रात्री ऐकत असल्याची माझी माहिती आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवाच अखिलेश यांचे निकटवर्तीय व अन्य सपा नेत्यांवर छापेमारी केली होती. हा आमच्या धास्तीचा परिणाम आहे असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.
या सगळ्या कारवाया पाहिल्यानंतर आपला पक्ष पराभूत होणार असल्याची याची खात्री भाजप नेत्यांना पटली आहे त्याचाच हा पुरावा आहे असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. असल्या कोणत्याही क्लुप्त्या योजल्या तरी आमच्या पक्षाचा विजय ते रोखू शकत नाहींत असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी योगींचा उल्लेख उपयोगी मुख्यमंत्री केला होता, पण योगी हे उत्तरप्रदेशसाठी पुर्णपणे निरूपयोगी आहेत असा टोमणाही अखिलेश यांनी मारला आहे.